लंडन | भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या याने लंडन येथे सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. तसेच ‘बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.’ असेही विजय मल्ल्याने म्हटले आहे.
बँकांना कर्जासाठी अर्ज करताना विजय मल्ल्या आणि किंगफिशर चा हेतू वाईट होता याचा कोणताही पुरावा नसल्याचे मल्ल्या याच्या वकिलाने लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टाला सांगीतले आहे. आय.डी.बी.आय. बँकेला किंगफिशर तोट्यात जाणार असल्याची कल्पना होती. बँकेच्या ई मेल वरुन हे स्पष्ट दिसत असून विजय मल्ल्या यांनी सरकारला अंधारात ठेवल्याचा सरकारचा आरोप खोटा असल्याचे मल्ल्या यांच्या वकिलांनी यावेळी म्हटले आहे.
विजय मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यासंबंधी त्याच्यावर लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टात केस सुरु आहे.
#WATCH “I met the Finance Minister before I left, repeated my offer to settle with the banks”, says Vijay Mallya outside London’s Westminster Magistrates’ Court pic.twitter.com/5wvLYItPQf
— ANI (@ANI) September 12, 2018
I obviously don’t agree with what the prosecution is alleging. Let the Court decide: Vijay Mallya outside London’s Westminster Magistrates’ Court pic.twitter.com/RblyPbDRI8
— ANI (@ANI) September 12, 2018
There is no evidence that Mallya or Kingfisher applied for bank loans with bad intent: Lawyer of Vijay Mallya tells Westminster Magistrates’ Court in London (File pic: Vijay Mallya) pic.twitter.com/o85n4SWXYp
— ANI (@ANI) September 12, 2018