अजित पवारला आता माझा आवाका कळेल; शिवतारेंनी सगळंच काढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युतीमध्ये एकत्र असूनही शिवसेना नेते विजय शिवतारे (Ajit Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) बंड पुकारलं आहे. शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही शिवतारेंनी अजित पवारांवर पुन्हा एकदा सडकुन टीका केली आहे. मी जनतेच्या हितासाठी राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटलं आहे असेही शिवतारेंनी ठासून सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवतारे म्हणले, बारामतीत लढणे कसे महत्त्वाचे आहे, तेथील गणिते कशी आहेत, हे मुख्यमंत्र्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बापू युतीधर्म पाळावा लागेल, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. ते त्यांच्या कर्माने मरतील. आपण त्यांच्या पराभवाचे धनी व्हायला नको असं शिंदेनी सांगितल्याचं शिवतारे म्हणाले. मात्र माझा आवाका काय आहे हे आता अजित पवारांना कळेल असं म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली. मी नसलो तरी अजित पवारांच्या पत्नी निवडून येत नाहीत. युतीची जागा जाणार आहे, असेही विजय शिवतारे यांनी सांगितलं.

मागच्या निवडणुकीत अजित पवार बोलले होते, विजय शिवतारे तूझा आवाका किती, तू बोलतो किती, तुझी लायकी काय ? पण आता अजित पवारला माझा आवाका कळेल असं म्हणत शिवतारेंनी खूल आव्हान दिले आहे. अजित पवारला त्यावेळी इतकी घमंड होती तर मग आता इतका का तडफडतोय असं म्हणत शिवतारेंनी अजित पवारांवर एकेरी टीका केली. अजित पवारांनी कोणताही उमेदवार दिला तरी माझा त्यांना विरोध असेल असं शिवतारेंनी स्पष्ट केलं.