विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा काठी अन् घोंगडे देवून सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कल्पवृक्ष शेळी पालन व मेंढी पालन उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाऊसाहेब ढेबे (काका) यांनी धनगर समाजाचे प्रतीक असलेले काठी अन् घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कराड तालुक्यातील कापील गोळेश्वर येथील युवा नेते भाऊसाहेब ढेबे यांच्या कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून साकारलेल्या कल्पवृक्ष उद्योग समूहास भेट दिली. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील- पोतलेकर, जि. प. सदस्य निवासराव थोरात, जि. प. सदस्य मंगल गलांडे, माजी जि. प. सदस्य विद्याताई थोरावडे, वनिता देवकर, आदर्श माता बाळूताई ढेबे, डॉ. महेंद्र भोसले, महादेव शिंदे, सरपंच बाळासाहेब जावीर, सुरेश जाधव, पांडुरंग देशमुख, नितीन ढापरे, सागर पाटील, प्रल्हाद देशमुख, अक्षय देशमुख, ऋषिकेश देवकर, भाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.

विजय वडेट्टीवार साहेब म्हणाले, भाऊसाहेब सारख्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने कष्टाच्या जोरावर केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने निर्माण केलेले शेतकरी साम्राज्य हे आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे. आई- वडिलांचा आशीर्वाद आणि कुटुंबाची सक्षम साथ यावर भाऊसाहेबांची वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांना आदर्श ठरेल.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भानुदास माळी यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर वैशाली ढेबे यांची पाचवड वस्ती गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झालेबद्दल सत्कार करण्यात आला.