सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदापूर प्रतिनिधी |बारामती लोकसभा मतदारसंघात कमळफुलवण्याचा पक्का इरादा केलेल्या भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बारामतीच्या पवार घराण्यावर नाराज  असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विजयसिंह मोहिते पाटील गेल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्याशी  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे असणारे जुनेसंबाध वापरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे भाजप हर्षवर्धन पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात कांचन कुल यांना समर्थन देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात भेट झाल्याचा अंदाज  राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे. मात्र या  दोन नेत्यांच्या भेटीने सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जाते आहे.

दरम्यान या आधी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात देखील भेट झाली आहे. त्या भेटीनंतर खुद्द शरद पवार देखील हर्षवर्धन पाटील यांना भेटले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांशी भेटीगाठी झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र त्यांच्या मनातील नाराजी  दूर झाली आहे का? असा सवाल सध्या विचारला जातो  आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

दुसरा मोदी  तयार होऊ नये याची मी काळजी घेतो आहे : शरद पवार

धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते :पंकजा मुंडे

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

Leave a Comment