विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा ताकद द्यावी : सुरेंद्र गुदगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आजवर सिमेंटबंधारे, कॉक्रिटीकरण, मुरमीकरण, साकव, गटर, रस्त्यांसारखी कोट्यावधीची कामे करण्यात आपणास यश आले. मात्र अलीकडच्या काळात विकासकामे करताना मर्यादा आलेल्या आहेत. तरुणांच्या मनातील विकासाच्या संकल्पना पुर्ण करण्यासाठी पाचवडकर ग्रामस्थांनी पुन्हा भविष्यात आपणास ताकद द्यावी, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंनी केले.

पाचवड (ता.खटाव) येथील पाचवड- विखळे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. त्यावेळी माजी सरपंच काकासाहेब घाडगे, बापूराव घाडगे, संजय अवघडे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासो मोहिते, नामदेव पाटील, रेल्वे पोलीस शशीकांत बाबर, सुरज कुंभार, महादेव अवघडे, जनार्दन घाडगे, गोट्या पाटील, सुनिल जाधव, सुनिल घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी गुदगे म्हणाले, पाचवड ते विखळे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची आपल्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यासाठी 15 लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करुन घेतला आहे. मात्र विखळे- पाचवड हा रस्ता पुन्हा विखळे हद्दीकडून खराब झाला असून त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ज्यादाचा निधी उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पाचवडकर ग्रामस्थांनी भविष्यात पुन्हा साथ द्यावी. अलीकडच्या काळात विकास कामे करताना मर्यादा येत आहेत. त्यासाठी पुन्हा सर्वांनी आपणास राजकीय ताकद द्यावी. आजवर विकासकामे करताना कोणत्याही आमदार- खासदाराची कमतरता ग्रामस्थांना भासून दिली नाही. विकासकामासाठी वाटेल तेवढा निधी आपण खेचून आणून कार्यकर्त्यांची कामे पुर्ण केली. पाचवडमधील महालक्ष्मी ग्रुपचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.