काँग्रेसच्या विरोधाकडे लक्ष देऊ नका, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा – विनायक मेंटेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापलं असून शिवसेनेच्या या भूमिकेला राज्यातील सत्तेचा वाटेकरी असलेल्या कॉंग्रेसनेच तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली असताना दुसरीकडे आमदार विनायक मेटे यांनी मात्र औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या विरोधकडे लक्ष देऊ नका असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

विनायक मेटे म्हणाले, “औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची चांगली संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात आलेली आहे. त्यांनी ती दवडता कामा नये. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात खूप प्रयत्न केले होते. जर यामध्ये काही अडचणी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात. त्यांच्या सरकार मधील काही पक्षांनी त्यांची मतं अबाधित ठेवण्यासाठी जरी विरोध केला तरी त्यांनी त्यांच्या विरोधाकडे लक्ष देऊ नये”, असं आवाहनही मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

दरम्यान, त्यांनी मराठा आरक्षणावरून काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीय. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये”, अशी जोरदार टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’