आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील, आणि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माईक ओढल्यानांतर विरोधकांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूर येथील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

राऊत म्हणाले, हे सरकार ६ महिने टिकलं तरी नशीब. फडणवीस आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि त्यांना नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यां बंडखोर आमदारांचे यापुढे राजकीय आयुष्य नाही अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्रीपदा वरून डिवचलं. मला अमृता फडणवीस यांचं वाईट वाटतं. त्यांनी किती नवस केले पण दिल्लीने फडणवीसांचा बकरा केला. तुम्हाला हाताखाली काम करावं लागतंय. फडणवीस यांच्या सारख्या निष्ठावंताची अवहेलना होते हे बघवत नाही असा चिमटा विनायक राऊत यांनी काढला.

Leave a Comment