हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरी शिर्डीमध्ये झालेल्या भाजप अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिग्गज नेते शरद पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी अमित शहांच्या तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढत त्यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्ला केला. त्यानंतर शरद पवारांच्या या टीकेवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पलटवार केला आहे.
शरद पवारांचे प्रत्युत्तर
अमित शहांवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, “हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील”
विनोद तावडेंचा पलटवार
विनोद तावडे यांनी एक ट्विट करत म्हणले आहे की, “दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे.”
अमित शहांची टीका
शिर्डीमध्ये पवारांवर टीका करत अमित शहा यांनी, “1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं” असे म्हणले होते.