Viral Cricket Video : एकाच बॉलवर 2 वेळा Out झाला फलंदाज; क्रिकेटमधील विचित्र घटना

Viral Cricket Video Stoinic
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Cricket Video : क्रिकेट हा खेळ तसा अनिश्चेतेचा… क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, अनेकदा हातात असलेला सामना आपण गमवताना बघितलय तर कधी कधी अशक्य वाटणारा विजय सुद्धा आपण मिळवताना बघितले आहेत. क्रिकेट मध्ये अनेक गमतीजमती सुद्धा पाहायला मिळतात. अशीच एक गंमत आणि त्याहून महत्वाचे म्हणजे विचित्र पद्धतीने आऊट होतानाचा विडिओ व्हायरल होत आहे. मार्कस स्टोयनीस हा फलंदाज एकाच चेंडूवर २ वेळा आऊट झाला आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असा आऊट झाला स्टोयनीस – Viral Cricket Video

सध्या दक्षिण आफ्रिकेत CSA T २० लीग सुरु आहे. या मध्ये काल डर्बन सुपरजाईंट आणि एमआय केपटाउन यांच्यातील सामन्यात मार्कस स्टॉइनीस 11 धावांवर बाद झाला. डर्बन सुपर जायंट्सच्या डावाच्या १५ व्या षटकात ऑली स्टोनने शॉर्ट पीच बॉल टाकला. या बॉल वर फटका मारताना स्टोयनीसचा तोल गेला आणि त्याची बॅट थेट स्टम्प वर जाऊन आदळली. हे इथवरच नाही थांबलं, स्टोयनीसने टोलवलेल्या बॉलवर स्क्वेअर लेगच्या फिल्डरने झेल घेतला. आणि त्यामुळे तो हिट विकेट आणि कॅच आऊट असं दोन्ही बाजूनी बाद झाला. हा विडिओ (Viral Cricket Video) पाहून तुम्हीही चकित व्हाल

दरम्यान या सामन्यात डर्बन सुपरजाईंटने ३६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५७ धावा केल्या. ब्रेटझेकने सर्वाधिक ४८ धावा बनवल्या तर या धावांचा पाठलाग करताना केपटाउनचा संघ अवघ्या १२१ धावात आपटला. केपटाउन कडून अष्टपैलू सॅम करणने सर्वाधिक ३८ धावा बनवल्या, डर्बन कडून मार्कस स्टोयनीस आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.