नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल पैसे कमावणे खूप सोप्पे झाले आहे. पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. काही लोक चांगल्या कामाने तर काही लोक वाईट कामाने पैसे कमवत असतात. पैसे कमावण्यासाठी लोक कधी कधी अशा कामे करतात जी समाजाच्या दृष्टीने वाईट असतात. पण जेव्हा लोकांना या कामांमधून पैसा मिळू लागतो तेव्हा ते समाजाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. अशीच काहीशी घटना अमेरिकन मॉडेलच्या बाबतीत घडली आहे. या मॉडेलने पैसे कमवण्यासाठी एका अॅडल्ट वेबसाइटवर आपले नग्न फोटो विकायला सुरुवात केली. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मॉडेलची आई तिला हे फोटो काढण्यास मदत करते. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी लॉरेन डस्कालो हि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत जे तिच्या बोल्ड आणि सुंदर स्टाईलचे दिवाने आहेत. लॉरेनने तिचे खूप बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अनेकदा बिकिनीमध्ये दिसते. इंस्टाग्रामपेक्षाही ती अॅडल्ट कंटेंट साइटओन्ली फॅन्सवर खूप लोकप्रिय आहे. यावर ती तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ विकून मोठी कमाई करते.
आई मुलीला अश्लील फोटो काढण्यास करते मदत
अलीकडेच लॉरेनने एका पॉडकास्टमध्ये एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे. यामध्ये तिला विचारण्यात आले कि पालकांना तिच्या कामाबद्दल माहिती आहे का, तेव्हा तिने सांगितले कि की जेव्हा तिच्या पालकांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते लॉरेनला काहीच बोलले नाही. आता तिचे वडील या कामासाठी सपोर्ट करतात तर आई तिला या कामात तिला मदत करते. तसेच लॉरेन पुढे म्हणाली कि, तिची आई कधीकधी तिचे अश्लील फोटो स्वतः काढते आणि फोटो-व्हिडिओसाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी तिला मदत करते.
अनेक लोक टोमणे मारतात
जेव्हा तिने आपल्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा आई तिला म्हणाली तिने नेहमी दर्जेदार राहावे आणि कोणतेही काम करावे. तिच्या कामाबद्दल आम्हाला काही हरकत नाही मात्र कुटुंबातील काही लोकांचा या कामाला खूप आक्षेप आहे. ते टोमणे मारत असतात पण आता आम्ही त्याची पर्वा करत नाही.




