Viral Post : धक्कादायक !!! हॉटेलवाल्यांनी चक्क सापाच्या कातड्यात गुंडाळून डिलिव्हर केला पराठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Post : सध्याच्या इंटरनेटच्या युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन उपलब्ध होऊ लागली आहे. आजकाल भूक लागली तरीही जेवण बनवण्याऐवजी लोकं ते फूड ऍपवरून ऑर्डर करतात. मात्र कधी कधी अशा काही विचित्र ऑर्डर मिळतात कि ते पाहून काय करावे हे कळतच नाही…

असेच काहीसे केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये घडले आहे. इथे एका मुलीने स्वत:साठी जेवण ऑर्डर केले, मात्र जेवण पाहून तिला घामच सुटला. ही घटना 5 मेची आहे. इथल्या एका हॉटेलने इतकी मोठी चूक केली कि, त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आणि हॉटेल काही दिवसांसाठी बंद करावे लागले.

सापाच्या कातड्यात गुंडाळलेले जेवण
तिरुअनंतपुरममध्ये एका हॉटेलमधून एका व्यक्तीच्या घरी जेवण मागवण्यात आले होते. जेव्हा ऑर्डर त्याच्या घरी पोहोचली, तेव्हा कुटुंबीयांना धक्काच बसला. कारण जेव्हा त्या घरातील मुलीने ऑर्डर उघडली तेव्हा तिला वर्तमानपत्रात गुंडाळलेली सापाची कातडी दिसली आणि यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. Viral Post

हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले
ज्या हॉटेलमधून जेवण आले त्या हॉटेलकडे आवश्यक असलेले सर्व लायसन्स आणि परवानग्या आहेत. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने तेथील खाद्यपदार्थांची तपासणी करत पुढील कारवाई सुरू केली. मात्र, त्यांना हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये कोणतीही गडबड आढळून आली नाही, त्यानंतर योग्य प्रकारे स्वच्छता राखण्याच्या सूचना देऊन सदर हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले आहे. Viral Post

हे ही वाचा : Social Media : अबब !!! चक्क पाळीव प्राण्यांप्रमाणे 6 मगरींचा सांभाळ करते ‘ही’ मुलगी

हे ही वाचा : जेलमधील कैद्यासोबतच चक्क महिला जेलरचे अफेअर, रोज पाठवायची तसले मेसेजेस

Leave a Comment