Viral Video : हेडलाईट आणि हॉर्न लावून केला जुगाड; सायकलचे केले इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतर

viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी गाडीचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी जुगाड वापरून कुणी विटातून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाडू व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वास्तविक, जुगाडचे नवीन व्हिडिओ (Viral Video) रोज व्हायरल होत असतात. पण आता जो जुगाड व्हायरल झाला आहे त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. वास्तविक, जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने आपल्या सायकलला असे काही केले, ज्यामुळे त्याची सायकल इलेक्ट्रिक बाइक बनली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर बघूया कसा झाला हा जुगाड…

अन सायकल झाली इलेक्ट्रिक बाईक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या सायकलला हिरो स्प्लेंडरचा लूक दिला आहे. लाल दिवा, नंबर प्लेट, हॉर्न असलेला साइड मिरर, हे सगळं. हेडलाइट्समुळे सायकलचा संपूर्ण लुकच बदलला आहे. वेड्या वाकड्या रस्त्यावर रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या साध्या सायकलमध्ये बदल करून एका वृद्धाने इलेक्ट्रिक बाइक बनवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Agasti Muna (@1agastimuna)

नेटकऱ्यानी केले जुगाडू माणसाचे कौतुक (Viral Video)

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ (Viral Video) बनवणाऱ्या व्यक्तीने सायकलचे प्रत्येक वैशिष्ट्य सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर 1agastimuna नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 90 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याला 4 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. अनेक लोक व्हिडिओवर कमेंट करत या माणसाच्या जुगाडचे कौतुक करत आहेत, तर काही लोक मजाही करत आहेत. हा बदल अनेकांना खूप आवडला आहे.