Viral Video : अनेक तरुण तरुणी यूपीएससीची परीक्षा देऊन ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहत असतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. हे आपल्याला माहिती असेलच. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय ट्राफिक लागल्या वेळेत देखील UPSC चा अभ्यास करतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्यक्तीचे सोशलवर मोठे कौतुक केले जात आहे. सोशल मीडिया युजर्सची मने या व्हिडीओने जिंकली आहेत.
काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
व्हायरल होणारा हा व्हिडीओ अवघ्या १२ सेकंदाचा आहे मात्र याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओ मध्ये झोमॅटो कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय दिसतो. रस्त्यावर जाताना तो ट्रॅफिकमध्ये थांबला आहे. मात्र त्याही वेळात हा व्यक्ती मोबाईल वर अभ्यासाचे व्हिडीओ पाहत आहे असा हा व्हिडीओ आहे.
After Watching this video, I Don't Think you Have any Other Motivation to Study Hard#UPSC #Motivation pic.twitter.com/BPykMKBsua
— Ayussh Sanghi (@ayusshsanghi) March 29, 2024
हा व्हायरल व्हिडिओ सर्वप्रथम आयुष संघी या यूजरने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने व्हिडिओसोबत (Viral Video) लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मला वाटत नाही की तुम्हाला कठोर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मोटिवेशनची गरज आहे. ही पोस्ट तब्बल 44,000 हून अधिक वेळा पाहिली गेली. शिवाय अनेक कमेंटही यावर आल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिले, “प्रेरणा मिळालेला उत्कृष्टतेचा मार्ग कठीण असू शकतो, परंतु पुरस्कार – अनमोल. #Believe #NeverStopLearning” दुसऱ्याने लिहले आहे केली, “हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे, तो मला नेहमीपेक्षा अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो.”
तर एका वापरकर्त्याने म्हटले, “हा एक आजार आहे… प्रेरणा नाही.” व्यस्त रस्त्यावर विचलित होणे धोकादायक असू शकते हे स्पष्ट करणे. दुसरा वापरकर्ता म्हणाला, “चुकीची प्रेरणा. अपघात होऊ शकतो.” तर इतर अनेकांनी अशा आव्हानात्मक वातावरणात (Viral Video) काम आणि शिक्षण यांचा समतोल साधण्याच्या डिलिव्हरी मॅनच्या क्षमतेचे कौतुक केले.