Viral Video | दिवाळीत चकल्या नीट गोल होत नाही? फॉलो करा ‘ही’ सोप्पी ट्रिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सध्या सर्वत्र दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा असा सण आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र धुमधाम दिसून येते. प्रत्येक घरात फराळापासून ते सजावट, रांगोळी, दिवे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. दिवाळीमध्ये दिवे, आकाश कंदील, रांगोळ्या, फटाके या सगळ्या गोष्टी तर असतातच. परंतु या सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फराळ.

दिवाळी ही फराळाशिवाय अपूर्णच म्हणावी लागेल. या दिवसांमध्ये महिला दिवाळीचा फराळ करण्याच्या तयारीत असतात. हे सगळे पदार्थ त्या अत्यंत आवडीने करतात. परंतु त्यातील सगळ्यांना आवडणारा आणि करण्यास अत्यंत अवघड असणारा प्रकार म्हणजे चकली. ही चकली बनवायला तशी अवघड असते. परंतु कुरकुरीत चकली खायला सगळ्यांनाच आवडते. चकली करताना त्याचे पीठ योग्य प्रमाणात भिजावे लागते. तसेच ते चकलीच्या सोऱ्यामधून योग्य पद्धतीने पडून गोल व्हाव्या लागतात. तसेच त्या चकल्या नीट तळाव्या देखील लागतात. म्हणजे चकली बनवणे ही महिलांसाठी एक मोठी कसरतच असते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दिवाळीतील चकल्या अत्यंत सोप्या पद्धतीने करत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगला चर्चेत आलेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक तरुण घरातील सोप्यावर बसून चकली करताना दिसत आहे. तो एका अनोख्या पद्धतीने जुगाड करून चकली करत आहे. त्याच्या चकली करण्याच्या या नवीन आयडियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे.

साधारणपणे चकली करताना ती गोल आकारात करावी लागते. परंतु त्या तरुणाने चकलीच्या सोऱ्यातून सरळ उभे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याला पाहिजे तेवढ्या आकारात चकली गुंडाळून तयार केलेली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. आणि अनेक लोक याला पसंती दर्शवत आहे. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “मजाक मजाक मध्ये तू चकली बनवण्याची खूप चांगली पद्धत सांगितलेली आहे.” त्याची चकली बनवण्याची ही पद्धत सोशल मीडियावर सगळ्यांना खूप आवडलेली आहे. आणि या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.