Viral Video : मंडळी समजा तुम्ही जंगल सफारीला गेला आहात आणि अचानक एक भलं मोठं जनावर तुमच्या अगदी जवळून गेलं … तर काय भंबेरी उडेल हे शब्दात सांगणं मुश्किल …! बरोबर ना …! मात्र सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत एक गोरिला जंगलात पर्यटकांच्या अगदी जवळून गेलेला दिसत आहे.
एका जंगलात पर्यटकांपासून काही फूट अंतरावर गोरिला बाहेर पडत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्त आहे. गोरिला आणि पर्यटकांच्या एका गटातील भितीदायक पण शांततापूर्ण चकमकीचा व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आलाय. जंगलात जमिनीवर विश्रांतीसाठी बसलेल्या पर्यटकाच्या अगदी जवळ गोरिला कसा आला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ट्रॅव्हल एक्सपर्ट आणि कंटेंट क्रिएटर कॅमेरॉन स्कॉट यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हंटले आहे की , “आयुष्य बदलणारी सिल्व्हरबॅक भेट, माझे पाहुणे कधीही विसरणार नाहीत असा क्षण! एक मोठा सिल्व्हरबॅक माउंटन गोरिला माझ्या क्लायंटपासून काही फूट अंतरावर आहे. आणि त्याच्या भव्य सौंदर्याचा एक शक्तिशाली परंतु आकर्षक रीतीने प्रदर्शन करतो. जंगलातील हे क्षण हे सर्व काही आहे आणि हे सर्व शक्य करणाऱ्या पडद्यामागील सर्व पार्क रेंजर्स, ट्रॅकर्स आणि संरक्षकांबद्दल आम्ही अधिक कृतज्ञ असू शकत नाही,” व्हिडिओसह अशाप्रकारे कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय आहे व्हिडिओत ?(Viral Video)
व्हिडिओ ओपन होतो ज्यामध्ये लोकांचा एक गट जमिनीवर हिरवीगार झाडामध्ये घेऊन बसलेला दिसतो. काही क्षणांतच एक गोरिला झुडपांतून बाहेर येतो आणि त्यांच्याजवळून चालत जातो. व्हैडीओ पाहून असे वाटते की गोरिला असेपर्यंत पर्यटकांनी जणू श्वास रोखून धरला आहे. आणि गोरिला गेल्यानंतर त्यांच्यामधील आनंदाचे आणि आश्च(Viral Video) र्याचे भाव दिसून येतात.
इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी या व्हिडिओबद्दल काय म्हटले?
हा व्हिडिओ (Viral Video) चार दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून, क्लिपने 9.2 मिलियनहून अधिक व्हीव्यू मिळवले आहेत. ही संख्या अजून वाढतच आहे. शिवाय यावर लोकांनी अनेक कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. “भाऊ त्याने माणसांना दुर्लक्ष करणे पसंत केले”. अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. “तुम्ही तिथे आहात याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही” अशी कमेंट एका दुसऱ्या युजरने दिली आहे.