धक्कादायक! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून २ किमी पळवलं; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ट्रॅफिक पोलीस आणि वाहन चालक यांच्यातील नातं चोर-पोलीस यांच्या नात्यासारखंच आहे. वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ट्रॅफिक पोलिसांच्या हातावर तुरी देण्याला मोठा पराक्रम मानतात, तर ट्रॅफिक पोलीस अशा वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी नेहमीच बाह्या वर करून तयार असतात.
सिंग्नलवर तैनात ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर वाहन चालकांना अडविण्यासाठी बऱ्याचदा जीव धोक्यात घालावा लागतो. अशावेळी वाहन चालक बऱ्याचदा वाहतूक पोलिसांना न जुमानता नियम धाब्यावर बसवून सराईतपणे निघून जातात. अशाच घटनांची आपबिती दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एका ट्रॅफिक पोलिसांने एका कारला अडवले आहे. यावेळी ट्रॅफिक पोलिस कार चालकाला कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत विचारणा करताना दिसत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये पुढच्याच क्षणाला कागदपत्र तपासली जाऊ नयेत यासाठी कार चालकानं थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. वाहतूक पोलीस गाडीच्या बोनेटवर पडला मात्र आरोपी चालकानं गाडी न थांबवता त्याला २ किलोमीटरपर्यंत घेऊन गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ह्या वाहतूक पोलिसांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली वाहतूक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. हा व्हिडिओ ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत अनेक मतमतांतर समोर आली आहेत. काही युझर्सच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ नोव्हेंबर २०१९ मधील असल्याचं सांगितलं जात आहे.

पहा व्हिडिओ-

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.