हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नऊवारी साडी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे लग्न असो, एखादे शुभकार्य किंवा एखादा सोहळा महिला आवडीने नऊवारी नेसून साज शृंगार करताना दिसतात. अशा अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. इतकंच काय तर अनेक नेटकरी या व्हिडिओला विशेष पसंती देखील देताना दिसतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत काही मराठी पोरी मराठमोळ्या स्वॅगमध्ये मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एकूण सहा तरुणी दिसत आहेत. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, या तरुणींनी वेगवेगळ्या रंगाच्या नऊवारी साड्या परिधान केल्या आहेत. (Viral Video) डोळ्यावर काळया रंगाचा गॉगल, नाकात नथ, साजेसा शृंगार आणि त्यासह मराठमोळ्या गाण्यावर या तरुणी बिनधास्त थिरकताना दिसत आहेत. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘नऊवारी पाहिजे’ गाण्यावर या सहा तरुणींनी भन्नाट डान्स केला आहे. या गाण्याच्या हुक स्टेप्स त्यांनी अगदी हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला आहे.
(Viral Video)हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल काही मिनिटं बस असतात. अशातच हा व्हिडिओ गेले सात दिवस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. shivani_divekar नावाच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओचे नेमके लोकेशन सांगता येणार नाही. मात्र या व्हिडिओत तरुणींच्या मागे मंदिर दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत या व्हिडिओला आपली पसंती दिली आहे.
या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांपैकी एकाने लिहिलंय की, ‘मराठी पोरी!! वाह… किती सुंदर!!’ तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय की, ‘साडी ही केवळ एक वस्त्र नाही. ती एक भारतीय स्त्रीची शक्ती आणि ओळख आहे. हिऱ्याची चमक आणि साडीची धमक कधीच कमी होत नाही’. (Viral Video) याशिवाय व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या अनेक नेटकऱ्यांनी तरुणींच्या मागे दिसणारे मंदिर हे ‘शांतादुर्गा टेम्पल’ असल्याचे म्हटले आहे.