उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत येणार; नव्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होती कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही भाजपकडून विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याचाच एक भाग.. त्यामुळे आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये जाणार यावर चर्चा सुरु असताना आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या एका दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क (Uddhav Thackera Contact With Modi) साधण्याचा प्रयत्न करत असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ते भाजपसोबत येतील असं खळबळजनक विधान रवी राणा यांनी केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी मोदीजींचं दर्शन घेतो आणि त्यांची माफी मागतो, असे झाले आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, असे उद्धव ठाकरेंना झाले आहे. काही नेत्यांच्या माध्यमातून ते मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील आणि काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील.

उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. पण मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे. रश्मी वाहिनी असो किंवा आदित्य ठाकरे असो, सर्वांमध्ये चिंतन चालू आहे कि आपण किती चुकलो … त्या सर्व चिंतनाचा एकच सार आहे कि आता मोदींशिवाय पर्याय नाही. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारस म्हणून घोषित झालेले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला स्वीकारून भाजपसोबत जोडले जातील असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशा शब्दात रवी राणा यांनी टीका केली.