… अन रोहित पवारांनी खेळलं क्रिकेट ; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे तरुणांचे लाडके तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. मात्र हेच नेते जर नवीन काही करत असतील तर चर्चा तर होणारच.रोहित पवारांच्या अशाच एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून तो मोठ्या प्रमाणावर शेअर देखील केला आहे.

https://www.facebook.com/1208862522629719/posts/1665657360283564/?sfnsn=wiwspwa

रोहित पवार हे दिग्गज नेते शरद पवार यांचे नातू असून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात बारामतीतूनच केली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी ते बारामती तालुक्यातल्या शिरसूफळमधून 2017 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. शिवाय कर्जत-जामखेडमधल्या शेतकऱ्यांशी रोहित त्यांच्या साखर कारखान्यामुळे आधीपासूनच जोडले गेले होते. त्यामुळे त्यांना कर्जत जामखेडमध्ये निवडणूक लढणे सोपे गेले.मात्र त्यांनी त्या ठिकाणी माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे.आणि मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्याने ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

रोहित पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय म्हणून आता ते अजूनच चर्चेचा विषय ठरले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सोलापूर मध्ये बिबट्याच्या शोधात हातात काठी घेऊन बिबट्याचा शोध घेताना सुद्धा ते दिसले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’