हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अगदी अचंबित करून टाकणारे असतात. डिजिटल युगात कधी काय घडेल याचा काहीही अंदाज नाही. अशावेळी जिकडे तिकडे रोबोटचा वाढता वापर आता आधुनिकपणाचा भक्कम पुरावा सिद्ध होत आहे.
गेल्या काही काळात विविध क्षेत्रांमध्ये रोबोटचा वापर वाढताना दिसलाय. यामुळे माणसाला व्यापार क्षेत्रात मोठा फायदा होत आहे. तसेच कामांना गती मिळतेय. असे असताना आता रोबोट वेटर्सचीसुद्धा जागा घेणार असं काहीस चित्र दिसून आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अहमदाबादमधील आहे. येथील एका बर्फ गोळा विक्रेत्याने लोकांना आईस गोळा सर्व्ह करण्यासाठी माणूस नव्हे तर चक्क रोबोट कामावर ठेवलाय होय. या आईस गोळा स्टॉलवर एक रोबोट ग्राहकांना आईस गोळा सर्व्ह करताना दिसतोय. या रोबोट वेटरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Viral Video) जो पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारतात अनेक ठिकाणी विविध फूड स्टॉल आणि कॅफे दिसून येतात येथील विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र, या आईस गोळा विक्रेत्याची शक्कल इतरांपेक्षा वेगळी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित आहे.
या विक्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क आपल्या स्टॉलवर वेटर म्हणून रोबोटला कामाला लावलंय. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हा एक कॅफे आहे ज्याला ‘रोबोट कॅफे’ म्हणून ओळखले जाते. या कॅफेमध्ये बर्फाचा गोळा बनवला जातो आणि हा बर्फाचा गोळा रोबोटच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व्ह केला जातो. या रोबोट मुळे हा कॅफे सध्या आकर्षण ठरला आहे. ग्राहकांना सुद्धा रोबोटच्या हातून आईस गोळा घ्यायला मजा येते आहे. माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ अहमदाबाद मधील प्रल्हाद नगर परिसरात आनंद नगर रोडवर असणाऱ्या ‘रोबोटिक कॅफेचा’ आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा रोबोट हातात ट्रे घेऊन ग्राहकांना आईस गोळा सर्व्ह करताना दिसतो आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर realshutterup नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अहमदाबादमध्ये पहिल्यांदा रोबोट बर्फाचा गोळा सर्व्ह करत आहे. फक्त चाळीस रुपयांचा आणि पूर्णपणे परवडणारा, स्वच्छ आणि ऑटोमॅटीक आहे. सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत’.
हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि पसंतदेखील केला आहे. तसेच यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी ‘हा रोबोट मला द्या मला कामवाली भेटत नाही’, असे मिश्कीलपणे म्हटले आहे. तर काहींनी ‘तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर केला जात आहे’, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. (Viral Video)