Viral Video | सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आलेला आहे. ज्यामध्ये जन्मलेल्या बाळाला चक्क दात आलेले आहेत. लहान मुलांना शक्यतो सहा महिने ते बारा महिन्यांच्या दरम्यान दात येणे सुरू होतात. काही मुलांना तर एक- दोन वर्षाचे होईपर्यंत दात येत नाही. परंतु सध्या अमेरिकेतील एका महिलेने असा दावा केलेला आहे की, तिच्या लहान मुलाने 32 दातांसह जन्म घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्या मुलाचा व्हिडिओ पाहून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहे. ही एक अत्यंत दुर्लभ अशी स्थिती आहे. जी ज्याला नेटल टीथ किंवा बेबी टीथ असे म्हणतात. याला जन्मजात आलेले दात असे देखील म्हणतात.
अमेरिकेमधील टेक्सास मधील डल्लास येथे राहणाऱ्या निका दिवा नावाच्या एका महिलेने एका लहान मुलाला जन्म दिलेला आहे. परंतु एका दुर्लभ स्थितीबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तिने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तिचे असे म्हणणे आहे की, तिची मुलगी 32 दातांसह जन्मलेली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. तेव्हा त्या मुलीच्या जन्मानंतरचा फोटो दिसत आहे.
या महिलेच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिने पहिल्यांदा तिच्या मुलीला कुशीमध्ये घेतले, तेव्हा त्या मुलीचे लाभ संपूर्ण दात होते. आणि ते पाहून तिला खूपच आश्चर्य वाटले. तिने जेव्हा हे डॉक्टरांना सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी तिलाही अत्यंत दुर्लभ अशी स्थिती असल्याचे सांगितलेले आहे. परंतु सोशल मीडियावर तिनेही जागरूकता पसरवण्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे. या महिलेने सांगितलेली आहे की, ही कोणत्याही प्रकारची मस्करी नाहीये. ही लहान मुलांमध्ये असणारी अत्यंत दुर्लभ स्थिती आहे आणि याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.
या प्रकारची स्थिती ही कोणत्याही बालकांसाठी अत्यंत गंभीर अशी परिस्थिती बनत नाही. परंतु जर त्या बाळाचे दात तुटले तर ते बाळ ते दात गिळण्याची देखील शक्यता असते. त्याचप्रमाणे आईचे दूध पिताना देखील या दातांमुळे मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकतात.