Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आपल्याला दररोज लाखो व्हिडिओज व्हायरल होताना दिसत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडिओ कधीकधी अत्यंत मनोरंजनात्मक असतात. तर कधी कधी आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. काही व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते की, प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार होतात. अगदी त्यांच्या जीवावर बेतेल असे कृत्ये देखील करतात. कधी स्टंट तर कधी जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गाडीवर त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये स्टंट करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता एका लहान मुलाचा ट्रेनमधील स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे की, अगदी जीवावर बेतेल असेल कृत्य तो करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या (Viral Video) या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये एक ट्रेन वेगाने धावत आहे. आणि दोन अल्पवयीन मुले या ट्रेनला लटकताना दिसत आहे. ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून ते त्यांचे एक हात आणि पाय बाहेर काढताना दिसत आहे. ट्रेन धावताना अनेक गोष्टी देखील येत आहे. परंतु चुकुं जर त्या लहान मुलाचा हात सुटला असता तर त्याचा जीव धोक्यात आला असता. परंतु त्या मुलाला त्याची कसलीही भीती वाटत नव्हती. ट्रेन मधील अनेक लोक त्याला आत मध्ये जाण्यास सांगत होते. परंतु व्हिडिओ शूट करण्याच्या नादात त्या मुलाने कोणाकडेही लक्ष दिले नाही. आणि जीवघेणा स्टंट करत राहिला.
हा व्हायरल होणारा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ मुंबईचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “कुठली आहेत ही पोरं यांना काही अक्कल आहे की नाही?” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ” बापरे” तसेच आणखी एका युजरने लिहिले आहे की, “चांगले झोडपले पाहिजे म्हणजे पुन्हा असे करणार नाही.” अशा प्रकारे अनेक लोक या मुलाच्या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.