Viral Video : चलो अयोध्या!!! पुणेकर तरुण चक्क 1500 किमी करणार पायी प्रवास; व्हिडीओ चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीतरी अतरंगी किंवा विचित्र केलं पाहिजे असा काही नियम नाही. कारण सोशल मीडियावर चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आणि धाडसाचे कौतुक करणारे नेटिझन्स खूप आहेत. त्यामुळे अनेक व्हिडीओ असेही व्हायरल होतात जे एकेकाला थक्क करून सोडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओतील तरुण हा पुण्याहून अयोध्येकडे पायी निघाला आहे. सध्या या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे आणि चांगलाच चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र क्वचितच नेटकऱ्यांना थक्क करून सोडतात. सध्या या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Viral Video) नुसता व्हायरल होत नाही तर त्याच्या कृतीची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहिलं तर पुण्याला चर्चेत राहण्यासाठी कोणत्या विशेष कारणांची गरज नाही. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, खाद्य प्रकार आणि पुणेरी पाट्या कायमच चर्चेचा विषय असतात. अशातच आता हा पुणेरी तरुणसुद्धा आता चर्चेत आला आहे.

पुणे ते अयोध्या १५०० किमी पायी प्रवास करणार (Viral Video)

हा पुणेरी तरुण सध्या पुण्याहून अयोध्येच्या दिशेने निघाला आहे. यावेळी तो तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास पायी करणार आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हा तरुण पाठीवर बॅग घेऊन पायी चालतो आहे. यावेळी त्याच्या हातात ‘जय श्री राम’ लिहिलेला भगवा झेंडासुद्धा दिसत आहे. (Viral Video) तसेच त्याच्या बॅगेवर एक छोटे पोस्टरसुद्धा लावलेले दिसत आहे. या पोस्टरवर ‘पुणे ते अयोध्या पायी यात्रा १५०० किमी’ असे लिहिलेले दिसत आहे. याशिवाय व्हिडीओत हा तरुण आपल्या प्रवासाची माहिती देतो आहे.

तो म्हणतोय की, ‘हा माझ्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. (Viral Video) माझ्याबरोबर सौरभ नावाचा माझा एक मित्र आहे. आमचा सर्वात पहिला स्टॉप असणार आहे शिर्डी. आता आपण पाहू या की शिर्डीला पोहचण्यासाठी किती वेळ जाईल. या प्रवासात तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि कमेंट्समध्ये फक्त जय श्री राम लिहा’.

या व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हर्षल घवारे असे आहे. हा व्हिडीओ त्याच्याच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल harshalghaware.02 नावाच्या इंस्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या बायोमध्ये तो एक इन्फ्लुअन्सर, अभिनेता आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे आणि नेटकरी कमेंट्समध्ये ‘जय श्री राम’ लिहिताना दिसत आहेत. (Viral Video)