हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात विविध भागात विविध रूढी आणि परंपरा आजही कायम आहेत. यामधील अनेक परंपरा अत्यंत लक्षवेधी आणि अनेकदा आश्चर्यकारक वाटतात. सोशल मीडियावर यापैकी बऱ्याच परंपरांचे जतन करणाऱ्या जमातींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण सारेच जाणतो की अनेक लोकांना घरात प्राणी पाळायला आवडतात. त्यामुळे कुत्रा, मांजर, गाय, बकरी, कोंबडी असे अनेक प्राणी अनेक घरात कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले जातात. या प्राण्यांचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक नंदीबैल दिसतो आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नंदीबैलाला एक विशेष स्थान आहे. नंदीबैलाला गावोगावी घेऊन भटकंती करणारी एक वेगळी जमात आहे. आपली संस्कृती परंपरा जपत ही जमात गेल्या अनेक शतकांपासून भ्रमंती करत आहे. (Viral Video) या भटकंतीतून ही जमात उदरनिर्वाह करत असते. बैलांचा खेळ दाखवून करमणूक करणे आणि भविष्यातील चांगल्या वाईट घटनांचे संकेत देणे यासाठी ही जमात प्रसिद्ध आहे. नंदीबैल हे शंकराचे वाहन आहे. त्यामुळे नंदीच्या रूपात साक्षात महादेवांचा अंश आल्याची भावना लोकांच्या मनात जतन करण्यात आली आहे.
या नंदीबैलाला एका विशिष्ट पद्धतीने सजवण्यात आलेले असते. त्याच्या अंगावर रंगबिरंगी छापे असतात. त्याच्या सजावटीत कोणतीही कसर सोडली जात नाही. नंदीच्या अंगावर रंगबिरंगी मऊ कपड्याची झूल असते. (Viral Video) त्याची शिंग अत्यंत मोठी असून तीदेखील सजवलेली असतात. नंदीच्या शिंगाच्या टोकावर पितळेच्या शेंब्या घातलेल्या असतात. मस्तकावर सुंदर बाशिंग आणि त्याच्या मध्यभागी शिवलिंग दिसते. ज्यावर नागदेवता असते. गळ्यात कवड्याची माळ आणि तालावर डोलणारा हा नंदी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो.असा हा सजवलेला नंदीबैल घेऊन ही जमात गावोगावी फिरत असते. ढोलकी वाजवून लोकगीते गाते आणि आसपासच्या लोकांना नंदीबैल आला अशी साद घातली जाते. दरम्यान लोक नंदीबैलाची पूजा करतात आणि व्यक्तीला अशी दहा तसेच दक्षिणा देखील देतात.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
व्हिडिओत दिसणाऱ्या या नंदीबैलाचे रूप अत्यंत सुंदर आणि मोहक आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती उभी दिसत आहे. जिच्या हातात ढोलकी आहे. नंदीबैलाचे आकर्षक रूप सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल prajwalmondkar नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हर हर महादेव’ असे लिहिण्यात आले आहे.
तसेच या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी आपल्या देशाची ही महान संस्कृती असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी आमच्या येथे पण नंदी येतात, असे म्हटले आहे. (Viral Video) एकंदरच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.