हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतीयांच्या टी टाईम स्नॅक्समधला सगळ्यात फेव्हरेट पदार्थ म्हणजे समोसा. अनेक लोकांना समोसा खायला प्रचंड आवडतो. मग तो समोसा कोणत्याही प्रकारातील असला तरीही फस्त होतो. चाट समोसा, छोले समोसा, रगडा समोसा, दही समोसा असे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये समोसा खाण्यापेक्षा एखाद्या गाड्यावर किंवा भेळवाल्याकडे मिळणारा समोसा जास्त टेस्टी असतो, असं म्हणतात. आता अर्थात खाणाऱ्याला चवीचं ज्ञान. पण तुम्ही कधी समोसा भेळ खाल्ली आहे? जर नसेल खाल्ली तर हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या तोंडाला १००% पाणी सुटणार आहे.
अनेकांसाठी भेळ आणि समोसा दोन्हीही वीक पॉईंट असतो. अशातच जर समोसा भेळ समोर आलीतर मग काय विचारायलाचं नको. हिरवी चटणी, लाल शेव आणि मस्त फरसाण मिक्स करून बनवली जाणारी समोसा भेळ पहायला जितकी कलरफुल खायला तितकीच चविष्ट असते. (Viral Video) सोशल मीडियावर ही समोसा भेळ कशी बनवली जाते त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्ही एकतर घरच्या घरी ही भेळ ट्राय करू शकता किंवा तुमच्या आसपास जिथे मिळत असेल तिथे जाऊन आस्वाद घेऊ शकता.
या व्हिडिओत आपण पाहू शकतो कि, एका खोल डब्ब्यात दोन समोसे घेऊन चमच्याच्या सहाय्याने त्याचे बारीक तुकडे केले. त्यानंतर मुरमुरे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण यात मिक्स केले. (Viral Video) मग चाट मसाला, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीला थोडंसं मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून या मिश्रणात घातले. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची चटणी, पुदिना आणि हिरव्या मिरचीची चटणी टाकून हे सर्व मिश्रण एकत्र केले. शेवटी एका ताटात ही भेळ काढून त्यावर लिंबाचा रस पिळून थोडीशी बारीक शेव भुरभुरली.