Viral Video | सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. आपण घरात बसून जगभरातील अनेक गोष्टी पाहत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. काही गोष्टी या मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ (Viral Video) पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटते. असाच एक विचित्र व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यामध्ये पती आणि पत्नीचे जोरदार भांडण झालेले आहे. भांडण झाल्यानंतर रागामध्ये त्या नवऱ्याने खूप घर पेटून दिलेले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
आनंदनगर मध्ये एका विवाहित जोडप्यामध्ये एक अनेक दिवसांपासून घरगुती वाद होता. परंतु त्यांच्यातील हा वाद खूप जास्त प्रमाणात वाढला. त्यांची भांडण (Viral Video) देखील मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. त्यानंतर रागात त्या पतीने त्यांच्या घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घराबाहेर फेकून दिल्या, आणि त्यांना आग लावली. या सगळ्या गोष्टींना आग लावताना तो खूपच रागात होता. त्यानंतर त्याने गाडीतील पेट्रोल काढले आणि त्या सामानावर शिंपडून पेटून दिलं. हळूहळू ती आग वाढत गेली आणि त्याचे संपूर्ण जळ घर जळून खाक झालेले आहे. त्याच्या बायकोला कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. खिडकीतून धूर बाहेर येत होता. ते पाहून ती घराबाहेर पडली. परंतु त्या दोघांमध्ये झालेला छोट्याशा भांडणामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.
आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा ही आग पाहिली, तेव्हा त्यांना वाटले की शॉर्ट सर्किट झालेले आहे. त्यांनी लगेच पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर सगळे घटनास्थळी आले. आणि ती आग विझवण्यात आली. त्यानंतर त्या दोघांनाही ती चूक मान्य केली आणि भविष्यात अशी चूक करणार नाही, हे देखील पोलिसांसमोर मान्य केले.