Viral Video | सोशल मीडियावर दर दिवसाला लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला भीती वाटते. घर बसल्या आपल्याला संपूर्ण देशातील माहिती एका क्लिकवर मिळून जाते. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एक ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकाने कंपनीच्या सेवांवर नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्या स्कूटरची तोडफोड देखील केलेली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती ओला शोरूम समोर उभा आहे. आणि तिथे पडलेल्या एका स्कूटरवर तो हातोड्याने घाव करत आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीने ती स्कूटर पूर्णपणे तोडून टाकली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की,”शोरूमने ९० हजार रुपयांचे बिल दिल्याने ग्राहकाला अत्यंत राग आल्याने त्यांनी रागाच्या भरात स्कूटर फोडली.”
या व्यक्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि ओला इलेक्ट्रिकच्या खराब ग्राहक सेवांवरून त्यांच्यावर टीका देखील केल्या जात आहे. याआधी देखील कॉमेडियन कुणाल कामर्याने ओला सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर ग्राहक सेवांबद्दल टीका केल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या गर्दीचा एक फोटो शेअर करायला होता आणि लिहिले होते की, “भारतीय ग्राहकांना आवाज आहे का? अनेक दैनंदिन कामगारांसाठी दुचाकी म्हणजे त्यांची जीवन आहे. अशा परिस्थितीत त्यांना हे सर्व करावे लागत आहे.”
कामराच्या या ट्विटला अग्रवाल यांनी उत्तर देत त्याच्या आरोपाला ‘पेड ट्विट’ म्हटले आहे. यावर त्यांनी लिहिले की, “कुणाल, तुला एवढी काळजी असेल तर येऊन आम्हाला मदत कर. मी तुला या पेड ट्विटपेक्षा किंवा तुझ्या अपयशी कॉमेडी करिअरपेक्षा जास्त पैसे देईन. नाहीतर गप्प बस आणि आम्हाला खऱ्या ग्राहकांचे प्रश्न सोडवू दे. आम्ही सेवा केंद्र वाढवत आहोत आणि प्रलंबित काम लवकरच संपवू.” अशाप्रकारे उत्तर त्यांनी दिले होते. परंतु आत्ता हा स्कूटर फोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.