Viral Video | आजकाल रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन आजकाल चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. त्यामुळे अनेक लोक देखील लोकलमध्ये प्रवास करताना खूप सांभाळून जात असतात. जेणेकरून त्यांची कुठलीही वस्तू चोरीला जाऊ नये. परंतु आजकाल चोर देखील नवीन नवीन आयडिया शोधून काढत आहेत. अनेकवेळा चोर हे खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करतात. अशातच आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या प्रवासादरम्यान खिडकी किंवा दरवाज्याजवळ मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना, त्या चोराने हा फोन चोरी केलेला आहे. जर तुम्ही देखील असा मोबाईल चार्जिंगला लावत असाल, तर आत्ताच सावध व्हा! कारण चोर कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईल करू शकतात.
आज-काल ट्रेनमध्ये देखील मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. परंतु चोर आता इतके हुशार झालेले आहे की, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते मोबाईल फोन चोरी करू लागलेले आहेत. चोर चालत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स घेऊन जातात. परंतु आता एक नवीन युक्ती काढलेली आहे. ते आता थेट खिडकीच्या बाजूला चार्जिंगला लावलेला मोबाईल आपल्याच डोळ्यादेखत चोरी करत आहे.
3 सेकंदात मोबाईल चोरी | Viral Video
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि ट्रेनच्या आतमध्ये देखील खूप गर्दी आहे. अशावेळी प्रवासांनी आपले मोबाईल चार्जिंगला लावलेले आहेत. अशावेळी ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर थांबते आणि तिथे एक तरुण बराच वेळ फेऱ्या मारताना दिसतो. त्यावेळी तो फेऱ्या मारताना मोबाईल नक्की कुठे आणि कसा ठेवलेला आहे? याचा अंदाज होतो. आणि जशी ट्रेन सुरू होती तसा तो खिडकी जवळ जातो. आणि खिडकीतून आत हात घालून मोबाईल बाहेर खेचून घेतो. ट्रेन सुरू झाल्यामुळे चोराला पकडण्याची संधी मिळत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. आणि आत्तापर्यंत लाखो वेळा हा व्हिडिओ पाहिला गेलेला आहे. या व्हिडिओवर अनेक आणि त्यांच्या कमेंट्सही केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ट्रेनमध्ये तुमचा मोबाईल चार्जिंगला लावत असाल, तर अत्यंत सावधगिरीने चार्जिंगला लावा. अन्यथा तो चोरी होण्याची शक्यता आहे.