Viral Video | रस्त्यावरून जाताना अचानक महिलेच्या डोक्यात पडली पाण्याची टाकी; पाहा संपूर्ण व्हिडीओ

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे रोज कितीतरी व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे आपल्याला खूप ज्ञान देऊन जातात. तसेच काही धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण रस्त्यावरून चालताना एका महिलेच्या डोक्यावर टेरेसवरून चक्क पाण्याची टाकी पडलेली आहे.

परंतु सुदैवाने त्या महिलेला कोणतेही शारीरिक दुखापत झालेली नाही. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की एक कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये एक महिला दुसऱ्या घरात जाताना दिसत आहे. तसेच जाता जाता काहीतरी खात आहे. परंतु अचानक रस्त्यात टेरेसवरून एक भली मोठी टाकी त्या महिलेच्या डोक्यात पडते. हा व्हिडिओ पाहून नीट करायला धक्का बसलेला आहे.

त्या महिलेला वाचवण्यासाठी एक व्यक्ती ते धावत आले. आणि महिला स्वतःच टाकी बाहेर डोकावू लागली. सुरुवातीला तिला काय झाले हे समजलेच नाही. त्यानंतर तिच्या डोक्यात पाणी टाकी पडली. हे तिच्या लक्षात आले नाही. आणि खास गोष्ट म्हणजे या गंभीर परिस्थिती महिला खात होती. या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला आहे. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोठ्या संख्येने यावर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेले आहे की, “ही अत्यंत गंभीर घटना आहे, परंतु मला हसू आवरता येत नाही.” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, “पाण्याच्या टाकीत अडकल्यानंतरही महिला सफरचंद खात होती हे सर्वात मजेशीर गोष्ट आहे.” आणखी एका एकाने लिहिले आहे की, “अशा घटनेवर हसू नये परंतु हा व्हिडिओ पाहून हसू आवरले नाही.” अशाप्रकारे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.