Viral Video : प्रचंड गर्दीत ट्रेनखाली अडकली महिला; आरडा ओरड, जीवाचा आकांत… अंगावर काटा आणणारी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. सकाळी ऑफिस टायमिंग चुकू नये म्हणून वेळेत निघालेल्यांना आणि घरी वेळेत पोहचायची ओढ असलेल्या लोकांना कायम लोकलची गर्दी पहावी लागते. धक्के- बुक्के खात हे प्रवास सुरूच आहेत, पण अशा प्रवासात कधीतरी एखादी थरारक घटना दृष्टीस पडते. सोमवारी मुंबईत झालेल्या वादळी पावसाने अचानक मुंबईकरांची दाणादाण उडवली. लोकलला अचानक गर्दी वाढली आणि ट्रेन पकडण्यासाठी सगळ्यांचीच घाई दिसून आली. दरम्यान महिला प्रवाशांची उडालेली झुंबड आणि त्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर ठाणे रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड दिसतेय. प्लॅटफॉर्मला लागलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी बऱ्याच महिला डब्याजवळ गर्दी करून एकमेकींना धक्का देताना दिसत आहेत. दरम्यान एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन चक्क ट्रेनखाली अडकल्याचे दृश्य यात दिसत आहे. प्रचंड गर्दीमूळे त्या महिलेला बाहेर पडणंसुद्धा अवघड झाल्याचं आपण पाहू शकतो. (Viral Video) जिवाच्या आकांताने तिची बाहेर येण्याची धडपड सुरु आहे. तर काही महिला प्रवासी तिला बाहेर ओढताना आरडा ओरडा करताना दिसत आहेत. एकंदरच हे दृश्य फारच थरारक आहे. हा व्हिडीओ रेलवे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

.. म्हणून अनर्थ टळला

काल मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल ट्रेन ३० ते ३५ मिनिटे उशिराने येत होत्या. परिणामी प्रवाशांची गर्दी सेकंद सेकंदाला वाढत होती. (Viral Video) यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. धक्काबुक्की आणि प्रचंड गर्दीच एकच प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. जो ती ट्रेन पकडण्याची धडपड करत होता. यातच त्या महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली अडकली. पण प्रसंगावधान दाखवून काही महिला प्रवाशांनी तिला वेळीच बाहेर काढल्याने मोठा भीषण प्रसंग टळला.

जबाबदार कोण?

ठाणे रेल्वेस्थानकावरील या घटनेच्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची केव्हढी गर्दी होती. अशातच ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी आरडा ओरड करत होती हे काहींच्या लक्षातही आले नाही. मात्र, काही महिलांनी पुढे येत तिला कसेबसे खेचून बाहेर काढले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (Viral Video) दरम्यान अनेक महिला धक्काबुक्कीमुळे एकमेकांच्या अंगावर पडल्या होत्या. या संपूर्ण घटनेमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एका पावसाच्या सरीत झालेला हा गोंधळ पाहून अनेकांनी या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.