Viral Video | आजकाल सोशल नाही आहे असे ठिकाण झाले आहे. जिथे प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतात. सोशल मीडियावर आपण घरबसल्या अनेक गोष्टी पाहू शकतो. अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओमधून लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आजकाल लोक कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर असाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. यामध्ये ती महिला पायऱ्यांवरून घसरत येताना दिसत आहे. नंतर खाली कोसळते तिला पाहून बाकीचे लोक खूपच घाबरतात. परंतु नंतर असे समजते की, ती हे सगळे फक्त व्हिडिओसाठी करत आहे. या महिलेचा व्हिडिओ पाहून सुरुवातीला सगळ्यांना तिची काळजी वाटते. परंतु नंतर लोकांनी तिच्यावर संताप व्यक्त केलेला आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video ) पाहू शकता की, एक महिला रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवरून चालत असते. आणि अचानक तिला चक्कर येते. आणि ती खाली कोसळते. पायऱ्यांवरून घरंगळत खाली येत असते. तेवढ्यात समोरून एक माणूस येतो आणि तिची मदत करतो. परंतु नंतर त्याला समजते की, ती महिला हे केवळ एका व्हिडिओसाठी करत आहे. त्यानंतर ती महिला स्वतःच उठून बसते आणि हसायला लागते.
सोशल मीडियावर instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहे. या व्हिडिओवरून या महिलेचे नाव आरती आहे असे लक्षात येते. त्या महिलेने हा व्हिडिओ शेअर करून “मला खूप जास्त लागले आहे” असे कॅप्शन दिलेले आहे. तिच्या या व्हिडिओवर युजरने मात्र संताप व्यक्त केलेला आहे.
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “यांच्यासारख्या लोकांमुळे इतर प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.” आणखी एका व्यक्तीने लिहीले आहे की, “या लोकांमुळे माणसांचा माणसांवरील विश्वास उडून जाईल. जेव्हा खरच कोणाला कोणाची गरज असेल. तेव्हा त्यांच्या मदतीला कोणीही जाणार नाही.” अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.