virar alibaug corridor : विरार- अलिबाग प्रवास दोन तासांत, काय आहे हा 55 हजार कोटींचा प्रकल्प ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

virar alibaug corridor : सरकारच्या आणखी एका महत्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक असलेला प्रकल्प म्हणजे विरार-अलिबाग कॉरिडॉर ही योजना लवकरच साकार होणार आहे. एमएमआरच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाची लांबी १२६ किमी आहे. आहे. या कॉरिडॉरच्या उभारणीसाठी सुमारे 18 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दोन फेजमध्ये होणार काम

कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. एका टप्प्यात 98 किमी. आणि दुसऱ्या टप्प्यात 29 कि.मी. बांधकामे होतील. हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू यांनाही जोडला जाईल. कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला (virar alibaug corridor) जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.

या प्रकल्पासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे हा प्रकल्प खर्चात सर्वात मोठा (virar alibaug corridor) वाटा हा भूसंपादनाचा असून त्यासाठी 22 हजार कोटींचा खर्च महामंडळाला येणार आहे. या प्रकल्पासाठी लवकरच म्हणजे मार्चमध्ये निविदा काढल्या जाणार असून 90% भूसंपादन झाल्यानंतर मे महिन्यात कार्यारंभ म्हणजेच वर्क ऑर्डर जारी केले जाणार आहेत तर नऊ महानगरांसह जेएनपीटी आणि नवी मुंबई विमानतळाला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती (virar alibaug corridor)

भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एक्सप्रेसवे 2030 मध्ये पूर्ण होऊन खुला होणे अपेक्षित आहे. जून 2021 मध्ये, MSRDC ला चिरनेर ते बलवली या 18 किमीच्या पट्ट्यासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली. सुमारे 5000 झाडे तोडली जाणे अपेक्षित (virar alibaug corridor) असून 221 हेक्टर वनजमीन वळवण्यात येणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, MSRDC ने नगर-चिरनेर भागासाठी वन मंजुरीसाठी अर्ज केला.

काय आहे आकडेवारी? (virar alibaug corridor)

  • एकूण अंदाजित खर्च: रु. 55,000 कोटी
  • प्रकल्पाची लांबी: 126 किमी
  • फेज 1 ची लांबी: 96.41 किमी
  • लेन: 8 ते 14 लेन
  • लेन रुंदी: 3.75 मी
  • डिझाइन गती: 120 किमी प्रतितास
  • RoW: विविध भागांमध्ये 45, 69, 99 आणि 126 मीटर
  • मेट्रो कॉरिडॉर: 26.5 मी
  • स्थिती: भूसंपादन आणि बोली सुरू आहे
  • भूसंपादन आवश्यक: १३४७ हेक्टर (टप्पा १)
  • भूसंपादन खर्च: रु. 22,000 कोटी
  • अंतिम मुदत: 2030
  • मालकी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)
  • प्रकल्प मॉडेल: अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC)