Tuesday, January 7, 2025

Navjot Singh Sidhu On Virat Kohli : सचिन नव्हे तर कोहलीचा बेस्ट बॅट्समन; नवज्योत सिंग सिद्धूने उधळली स्तुतीसुमने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाने यंदाचा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी अंतिम सामन्यात 76 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळलेल्या विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वात बेस्ट बॅट्समन असून त्याने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सुद्धा मागे टाकलं असं सिद्धू यांनी म्हंटल आहे. विराट कोहली हा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा, जनमानसाचा माणूस आहे असं म्हणत सिद्धू यांनी कोहलीचे तोंडभरून कौतुक केलं.

खरं तर वर्ल्डकप मध्ये विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला होता. पहिल्या सात सामन्यात त्याला केवळ 75 धावा करता आल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर आणि एकवेळ भारताची अवस्था 34/3 असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली आणि भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. या स्पर्धेत कोहलीने जरी 38 आणि 24 धावा केल्या तरीही त्याने धावगती कमी होऊ दिली नाही. विराट एका वेगळ्याच अंदाजात खेळत होता. विराट कोहली, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा, जनमानसाचा माणूस, एक उत्कृष्ट कामगिरी करणारा, एक प्रतिभावान खेळाडू आहे असं म्हणत सिद्धूने कोहलीचे कौतुक केलं.

यानंतर सिद्धू यांनी विराट कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पेक्षाही महान खेळाडू असल्याचे सांगितलं. विराट कोहली हा आतापर्यंतचा महान भारतीय फलंदाज आहे”. महान क्रिकेटपटुंच्या यादीत कोहली स्वतःला सचिन तेंडुलकरच्याही पुढे घेऊन गेला आहे असं विधान सिद्धू यांनी केलं आहे. वज्योत सिंग सिद्धू यांच्या या दाव्यानंतर सचिन तेंडुलकरचे चाहते काय भावना व्यक्त करतात ते आता पाहायला हवं.