Virat Kohli : RCB मध्ये लवकरच होणार एबी डीव्हिलियर्सचे कमबॅक??? विराट कोहलीने दिली ‘ही’ माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फॅन्समध्ये Virat Kohli आणि एबी डीव्हिलियर्स खूप लोकप्रिय आहेत. विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्सने यांनी आपल्या भागीदारीने कित्येक वेळा RCBला मोक्याच्या क्षणी सामने जिंकवून दिले आहेत. डीव्हिलियर्सने मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाही आहे. बँगलोरचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत. एबीडीचा खास मित्र असलेला विराट कोहली देखील त्याला अपवाद नाही आहे. विराटने एक मोठी घोषणा करून एबीडीला मिस करणाऱ्या फॅन्सला एक आनंदाची बातमी दिली आहे.

Virat Kohli ने एका कार्यक्रमादरम्यान आपण डीव्हिलियर्सला मिस करत असल्याचं मान्य केलं. ‘मी त्याला खूप मिस करतो. मी त्याच्या नियमित संपर्कात आहे. तो सध्या अमेरिकेत असून ऑगस्टा मास्टर्स या गोल्फ स्पर्धेचा आनंद घेत आहे. डीव्हिलियर्स त्याचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत ही स्पर्धा पाहात आहे. तो आरसीबीचे सामने नियमित पाहात आहे. पुढच्या वर्षी तो एका खास भूमिकेत आपल्याला दिसू शकतो,’ असे विराटने यावेळी सांगितले.

यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये एबीडी व्हिलियर्स आरसीबीचा मेंटॉर म्हणून येणार असल्याची चर्चा होती, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. त्यानंतर आता स्वतः Virat Kohli नंच याबाबतचे संकेत दिल्यानं पुढच्या सिझनमध्ये डीव्हिलियर्स आरसीबीच्या कॅम्पमध्ये दिसण्याची शक्यता वाढली आहे. Virat Kohli ने मागच्या सिझननंतर आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. सध्या फाफ ड्यूप्लेसिस हा आरसीबीचा कॅप्टन आहे. फाफ ड्यूप्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 12 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून पॉईंट टेबलमध्ये सध्या ती चौथ्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli pens emotional message to AB de Villiers after RCB star  retires: This hurts my heart, love you - Sports News

IPL विषयीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.iplt20.com/

हे पण वाचा : 

e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार ‘हे’ फायदे

Prepaid Plans : वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कोणता ???

Tollywood : राजामौलींचा चित्रपट केल्यानंतर सुपरस्टार्स का फ्लॉप होतात ???

Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???

Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा

Leave a Comment