विराट – अनुष्का झाले आई-बाबा ; विराटच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन

virat anushka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

विराटनं ट्विट केलं की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट”

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये इटली येथे लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी अनुष्काने वोग (Vogue) या मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत बाळाच्या संगोपनाबाबतची माहिती दिली होती. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असे अनुष्का म्हणाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’