हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली( Virat Kohli)… भारतीय क्रिकेटचा किंग कोहली… रनमशीन.. आणि मित्रांचा चिकू…. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली…. याच कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीची 16 वर्षे पूर्ण केली आहेत. १६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी विराटने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून मुख्य भूमिका बजावली. तिन्ही फॉरमॅट मध्ये संघाचे नेतृत्व केलं. मागील १६ वर्षेत सतत क्रिकेट खेळत विराट कोहलीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. आज आपण विराटच्या आत्तापर्यंतच्या एकूण कामगिरीचा आढावा घेऊया….
२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवातीपासूनच आपल्या खेळतात सातत्य राखलं… त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर असे दिग्गज खेळाडू होते. परंतु या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यांवर घेतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने अनेकदा भारतीय संघाला संकटातुन बाहेर काढलं आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहली भारतीयांच्या मनातील किंग कोहली बनला…. आजची त्याचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठा फॅनबेस आहे.
कशी आहे कोहलीची कारकीर्द? Virat Kohli
विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 191 डावांमध्ये त्याने 49.15 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत 29 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे. याशिवाय, वनडेच्या 283 डावांमध्ये त्याने 58.18 च्या सरासरीने 13906 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील उर्वरित 117 डावांमध्ये किंग कोहलीने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राइक रेटने 4188 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकतंच त्याने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहलीने महेंद्रसिंघ धोनीनंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी संघाचे नेतृत्वही केले. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नवी उंची गाठली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या, मात्र टीम इंडिया वर्ल्ड कप सारखी आयसीसी ची कोणतीही मोठी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यानंतर रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेटचे नेतृत्व सोपवण्यात आलं.