टीम हॅलो महाराष्ट्र। टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. यावेळी विराटने माजी कर्णधार महिंद्रसिंग याला मागे टाकत कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात सर्वात जलद धावा पूर्ण करत रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३४ धावांची मॅच विनिंग खेळी केली. यावेळी विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत रोहित शर्माला मागे टाकलं, तर कर्णधार म्हणून १००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. कर्णधार म्हणून विराटने सर्वात कमी सामन्यात १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात हजार धावा पूर्ण करणारा विराट दुसरा तर कर्णधार म्हणून सहावा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताकडून महेंद्रसिंह धोनीनी ही कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून धोनीच्या नावे ७२ सामन्यात १११२ धावा आहेत. तर विराटच्या नावे ३२ सामन्यात १००६ धावा आहेत. यासोबत कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसला यामध्ये मागे टाकलं आहे. फाफ डू प्लेसिसने ३१ डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर विराट कोहलीने अवघ्या ३० डावांमध्ये हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
१००० धावा पूर्ण करणारे खेळाडू
विराट कोहली (भारत)- ३० डाव
फाफ डू प्लेसिस (दक्षिण अफ्रिका)- ३१ डाव
केन विलियम्सन (न्यूझीलंड)- ३६ डाव
इयान मोर्गन (इंग्लंड)- ४२ डाव
विलियम पिटरफिल्ड (आयर्लंड)- ५४ डावा
महेंद्रसिंह धोनी (भारत)- ५७ डाव
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News