हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुबईतील प्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात विराट कोहलीच्या नवीन मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या नवीन पुतळ्यात, कोहली टीम इंडियाच्या नवीन जर्सी नेव्ही ब्लूमध्ये आहे.
दुबईमध्ये मादाम तुसा संग्रहालयाचं गेल्याच आठवड्यात उद्घाटन करण्यात आलं आहे. या संग्रहालयात विराट कोहलीसह इंग्लंडची राणी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, अॅक्शन स्टार जॅकी चेन, फुटबॉलपटू मेस्सी, टॉम क्रुझ , पॉप स्टार रिहाना यांच्या आणि इतर 60 लोकांच्या पुतळ्याचा समावेश आहे.
Wax statue of Virat Kohli unveiled Madame Tussauds. 👑 pic.twitter.com/sgDpp1VI1O
— Virat Kohli Trends™ (@TrendVirat) October 18, 2021
क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर नंतर, इंग्लंडमधील मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा लावलेला कोहली दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. दरम्यान, जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात कोहलीचा नवीन पुतळा बसवण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा 2018 मध्ये कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण दिल्लीतील मादाम तुसाद संग्रहालयात करण्यात आले होते.