हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा मैदानावरील त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. विराटाच्या आक्रमक स्वभावामुळे प्रतिस्पर्धी संघ कायम बॅकफूटवर जातो, मात्र हाच आक्रमक स्वभाव कधी कधी विराटच्या अंगलटी येतो. कालच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात (CSK vs RCB) सुद्धा याचाच परिचय आला. चेन्नईला सलामीवीर राचीन रवींद्र बाद होताच विराटने त्याला सेंड ऑफ दिला. यादरम्यान विराटच्या तोंडून काही अपशब्द सुद्धा गेले. सोशल मीडियावर विराटचा हा विडिओ व्हायरल (Virat Kohli Viral Video) होत आहे.
नेमकं घडलं काय? Virat Kohli Viral Video
विराट कोहलीच्या आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने 7व्या षटकातच 70 च्या वर धावा केल्या. सलामीवीर राचीन रवींद्र आक्रमक क्रिकेट खेळात होता. चारीबाजूनी त्याने जोरदार फटकेबाजी करत बंगळुरूच्या संघावर हल्ला चढवला, त्यामुळे सुरुवातीपासून आरसीबीचा संघ बॅकफूटवर गेला. रचिनने 15 चेंडूत 3 षटकार आणि तब्बल 3 चौकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी खेळली. मात्र डावाच्या 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रचिन आणखी एक मोठा शॉट खेळायला गेला तेव्हा त्याला रजत पाटीदारने डीप मिड-विकेटच्या दिशेने झेलबाद केले. राचीनची विकेट जाताच कोहलीने जल्लोष केला, यावेळी त्याच्या तोंडातून काही अपशब्द गेले.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) March 22, 2024
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने ने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवला. महत्वाच्या क्षणी ४ बळी घेणारा मुस्तफिजूर रहमान सामन्याचा मानकरी ठरला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७३ धावा केल्या. मात्र चेन्नईने दिमाखात हे टार्गेट गाठलं. बंगलुरूची गोलंदाजी दरवर्षी सारखं आजही निष्प्रभ ठरली. चेन्नईने अतिशय आरामात फलंदाजी करत विजय मिळवला. चेन्नईकडून राचीन रवींद्रने ३७, अजिंक्य रहाणे २७, डार्लि मिचेल २२, शिवम दुबे ३४ आणि जडेजाने २५ धावा केल्या.