हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ….. नाव वाचताच पहिल्यांदा आठवत ते म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील वाद आणि मतभेत.. आयपीएल मध्ये अनेकदा गंभीर आणि विराटला भर मैदानात भिडताना क्रिकेट चाहत्यांनी बघितलंय. त्यामुळे आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचे कस होणार? दोन्ही खेळाडू एकमेकांना कस जमवून घेणार असा प्रश्न टीम इंडियाच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र आता दोघांच्या नात्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले आहे की, तो गंभीरसोबतचा मागील वाद विसरून पुढे जाण्यास तयार आहे. कारण हे काम भारतीय क्रिकेट आणि संघाच्या हिताचे आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, “गंभीरसोबतच्या मागील वादाचा ड्रेसिंग रूमवर तसेच भारताचा संपूर्ण संघावर कोणताही परिणाम होणार नाही.” याबाबत विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिका-यांकडे आपले मत व्यक्त केले आहे.रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, T20 विश्वचषकानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये भूतकाळातील वादावर चर्चा झाली आहे आणि या काळात त्याच्या ज्या काही तक्रारी होत्या. त्या सर्व तक्रारी आणि मतभेद संपुष्टात आलेत. भारतीय संघाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी कामगिरी करण्याचा मानस या दोघांनीही व्यक्त केल्याचे रिपोर्ट मधून सांगण्यात आलंय.
काही महिन्यांपूर्वीच गौतम गंभीरने विराटबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. विराट आणि माझ्यात दोघांमध्ये नेमका बॉण्ड कसा आहे हे देशाला ठाऊक नाही. “जे काही वाटतं ते प्रत्यक्षात जशी स्थिती आहे त्याहून फारच वेगळं आहे. माझं विराटबरोबरचं नातं हे देशाला माहित नाही. आपआपल्या संघाचे नेतृत्व करताना व्यक्त होण्याचा माझ्याइतकाच हक्क विराटालाही आहे. आमचं नातं हे लोकांना (वादाचा) मालमसाला देण्यासाठी नाहीये,” असं गंभीरने सांगितलं होतं.
दरम्यान, रोहित शर्मासोबत विराट कोहलीचीही श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. याआधी रोहित आणि विराटही श्रीलंका दौऱ्यातून बाहेर राहण्याची शक्यता होती. मात्र, गंभीरच्या विनंतीवरून दोन्ही खेळाडूंनी वनडे फॉरमॅटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.