केंद्राची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरत आहे. कोरोना विषाणूच्या या दुसऱ्या लाटेचा धोका आणि त्याची पूर्वकल्पना केंद्र सरकारला आधीच देण्यात आली होती पण सरकारची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरम(INSACOG)मधून राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.

ही फोरम कोरोना विषाणू च्या विविध व्हेरीअंट यांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फोरम मध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू तज्ञांचा समावेश करण्यात आला होता. कोरोनासाठीच्या या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील मागील काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पण सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समिती तुंना राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती जमील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीदरम्यान दिली . जैव प्रौद्योगिकी विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजून तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

केंद्राला आगोदरच दिली होती पूर्वकल्पना

माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांनुसार या फोरमने केंद्राला अगोदरच पूर्वकल्पना दिली होती की मार्च महिन्यात करोना विषाणू ची नवीन लाट येईल यात मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढेल. परिणामी कोरोना संसर्गाचा वेग वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. पण केंद्र सरकारने सल्लागारांच्या संकेता कडे दुर्लक्ष केलं त्यामुळे गाफील राहिलेल्या देशाला मार्चपासून करोना विषाणूचा तीव्र फटका बसला आहे

Leave a Comment