विशाल पाटील यांनी मंगळवारपासून जत तालुका दौरा सुरू केला आहे. गेंढगिरीतून त्यांचा सुरूवात केली. त्यांनी देवनाळ, मेंढिगिरी, उंटवाडी, रावळगुंडी, मुचंडी, दरीबडाची, संख, भिवर्गी, तिकोंडी, करेवाडी, कोंतेबोबलाद या गावांचा दौरा केला. तालुक्यातील विविध गावात विशाल दादांचे फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
विशाल म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा म्हैसाळ योजनेचे जनक आहेत. जत तालुक्याला पाणी देण्याचे त्याचं स्वप्न होते जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न दादा कुटुंबिय सोडूवू शकते. प्रत्येकाच्या शेतात पाणी आले पाहिजे हे आमचं ध्येय आहे आणि हे पाणी शेतकऱ्याला फुकट मिळालं पाहिजे. जत तालुक्यातील शेतकऱ्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मी मोफत मिळवून देईन. खासदारांनी दिल्लीत जाऊन काय करायचं असते हेच मुळात आपल्या खासदारांना कळले नाही. ज्यांना हिंदी आणि इंग्रजी साधा बोलता येत नाही तेच दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार आहेत , असा टोला त्यांनी लगाविला. तर जत तालुक्याची अवस्था भयानक आहे, जनावरांना प्यायला पाणी नाही. चारा नाही. माणसांना प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत टँकर सुद्धा मिळू शकत नाही. मी आपल्याला न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही विशाल पाटील यांनी दिली.