आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ; विशाल पाटील स्पष्टच बोलले

Vishal Patil Vishwajeet Kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा निवडणुकीवरून (Sangli Lok Sabha) सध्या राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी गेली अनेक वर्ष तयारीला लागलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांचं काय?? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे जर काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळत नसल्यास विशाल पाटील भाजपकडून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत. यानंतर विशाल पाटील यांनी स्पष्टपणे यावर खुलासा करत आपली भूमिका मांडली आहे.

पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत असताना विशाल पाटील म्हणाले, आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजीत (Vishwajeet Kadam) पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र असे काही नाही, त्यामुळे वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे असं म्हणत आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं.

यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil0 यांच्यावर सडकून टीका केली. आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव-सांगली करतो. राजा- राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो असे म्हणत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली.