हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा अनेकांचा जीव कि प्राण झाला असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक
मोबाईल कंपन्या त्यांचे स्मार्टफोन वेगवेगळ्या प्रकारात मार्केटमध्ये आणत असतात. यातच आता प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड असलेल्या विवोने सुद्धा त्यांच्या मोबाईलची नवीन सिरीज मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. Vivo Y20, Y22s, Y16, Vivo1724 या विवो च्या मॉडेल सोबतच आता ivo S17 Pro हा मोबाईल कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये ब्लॅक आईस व्हाईट जेट, माउंटन सी ग्रीन हे कलर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया या मोबाईलचे काही खास फिचर्स
6.78-इंचाचा डिस्प्ले –
Vivo S17 Pro या मोबाईलची खासियत सांगायची तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच फुल-एचडी 2800 x 1260 पिक्सेल चा AMOLED डिस्प्ले आहे. हा मोबाईल Android 13 वर आधारित OriginOS 3 वर चालतो. Vivo S17 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम नेनो सपोर्ट मोबाईल आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मोबाईलच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo च्या या मोबाईलची बॅटरी 4,600mAh ची असून आणि हा मोबाईल 80W वायर्ड फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करण्यात आला आहे. यामध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर बसवलेला आहे. AI फेस अनलॉक ची सुविधाही तुम्हाला या मोबाईल मध्ये मिळते.
किंमत किती –
Vivo S17 Pro ची किंमत त्याच्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळी आहे. यामधील 8GB + 256GB व्हेरीएन्ट असलेल्या मोबाईलची किंमत (CNY 3,099) म्हणजेच अंदाजे 36 हजार 100 रुपये आहे तर 12GB + 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत (CNY 3,499) म्हणजेच अंदाजे 40 हजार 700 रुपये एवढी आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आला असून भारतीय बाजारपेठेत तो कधी दाखल होईल ते आत्ताच सांगणं कठीण आहे.