हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी विवोने (Vivo V25 Pro) आपला लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V25 Pro भारतात लॉन्च केला आहे. अत्यंत दमदार फीचर्स असलेला हा स्मार्टफोन नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे हा मोबाईल कलर चेंजिंग रियर ग्लास पॅनेलसह येतो. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोन मधील खास फीचर्स आणि त्याची किंमत…
6.53 इंच डिस्प्ले-
विवोच्या मोबाईलला (Vivo V25 Pro) 6.53 इंच फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2,376×1,080 पिक्सेल असून रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. मोबाईलला 4830mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 66W फास्ट चार्जिंगला सॅप्पोर्ट करेल. हँडसेटमध्ये थ्रीडी वक्र स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप-
मोबाईलच्या (Vivo V25 Pro) कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, या स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने एंट्री-ग्लेअर डिझाइनचा वापर केला आहे. या एजी ग्लासमुळे सूर्यप्रकाश पडल्यावर बॅन पॅनेलचा रंग बदलतो. परंतु हे पॅनल फक्त फक्त ब्लू कलर व्हेरियंट मधेच उपलब्ध राहील.
किंमत – (Vivo V25 Pro)
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास त्याची किंमत स्टोरेजनुसार वेगवेगळी आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची (Vivo V25 Pro) किंमत 35 हजार 999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 39 हजार 999रुपये आहे. स्मार्टफोन 25 ऑगस्टपासून विवोच्या ऑनलाइन स्टोअर आणि इतर रिटेल चॅनेलद्वारे प्युअर ब्लॅक आणि सेलिंग ब्लू कलर ऑप्शन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
हे पण वाचा :
OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज
Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? अशा पद्धतीने करा चेक
Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही
iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स
Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा