हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल (Vivo V27) उत्पादक कंपनी Vivo ने आज विवो V27 सिरीज लाँच केली आहे. याअंतर्गत Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे २ स्मार्टफोन लाँच करण्यात आलेआहेत. विवो V27 सीरीजला Android 13 आधारित Funtouch OS 13 आणि MediaTek च्या टॉप चिपसेटचा सपोर्ट मिळेल. तसेच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व्ड स्क्रीन आणि रंग बदलणारे काचेचे पॅनेल देखील मिळतील.
फीचर्स –
विवो V27 Pro आणि विवो V27 ची वैशिष्ट्ये काही प्रमाणात एक सारखीच आहेत. दोन्ही मोबाईलला 120Hz रिफ्रेश रेट सह 6.78-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो. विवो V27 मध्ये Dimensity 7200 5G प्रोसेसर देण्यात आला आहे तसेच यामध्ये Android 13 आधारित FunTouch OS 13 आहे. विवो V27 Pro मध्ये 4nm MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर विवो V27 मध्ये Dimensity 7200 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, दोन्ही मोबाईल मध्ये पाठीमागील बाजूला ३ कॅमेरा आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX766V सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी समोरील बाजूस 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोबाईल मध्ये 4,600mAh बॅटरी देण्यात आली आहे. 66W फास्ट चार्जिंगच्या मदतीने अवघ्या १९ मिनिटात तुम्ही ५० टक्के चार्जिंग करू शकता.
किंमत किती – Vivo V27
विवो V27 Pro च्या 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 37,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 12 जीबी रॅमसह 256 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 42,999 रुपये आहे. तर दुसरीकडे विवो V27 च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 32,999 रुपये आणि 12 GB रॅम व 256 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 36,999 रुपये आहे. तुम्हाला हा मोबाईल मॅजिक ब्लू आणि नोबल ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. कंपनीने Vivo V27 आणि विवो V27 Pro साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. विवो V27 Pro ची विक्री 6 मार्चपासून सुरू होणार आहे. विवो V27 ची विक्री 23 मार्चपासून सुरू होईल.