Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च; किंमत 11 हजारांहून कमी

Vivo Y02s
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo चे मोबाईल बाजारात जोरदार चालतात. आता विवोने आपला नवा मोबाईल Vivo Y02s लाँच केला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत बजेट मध्ये असलेल्या या मोबाईलची किंमत ११ हजारांहून कमी आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनचे खास फीचर्स ..

 6.51-इंचाचा डिस्प्ले –

Vivo च्या या मोबाइलला 6.51-इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे जो HD+ रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. मोबाइल मध्ये पॉवर बटणावर फिंगरप्रिंट स्कॅनर इंटिग्रेटेड करण्यात आले आहे. या फोनमध्ये Mediatek Helio P35 Soc प्रोसेसर असणार आहे.

8MP कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झाल्यास, मोबाइलला पाठीमागील बाजूस 8MP चा मुख्य कॅमेरा आहे आणि विडिओ कॉल व सेल्फी साठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस एलईडी फ्लॅश लाईट आहे.

5000mAh बॅटरी-

हा स्मार्टफोन Mediatek Helio P35 या प्रोसेसरवर काम करतो. मोबाइल स्टोरेज बाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनला 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज दिले जात आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. तसेच मोबाईलला 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये ड्युअल सिम, 4G, ब्लूटूथ, GPS आणि 3.5mm ऑडिओ जॅक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी –

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y02s हा एक बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा स्मार्टफोन सॅफायर ब्लू आणि शाइन ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो आणि त्याची किंमत अंदाजे रुपये 10,600 आहे. हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याच्या ग्लोबल लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.