Vivo Y22 : 50MP कॅमेराचा Vivo चा दमदार स्मार्टफोन लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Vivo Y22
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन (Vivo Y22) निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन Y सीरीज स्मार्टफोन Vivo Y22 भारतात लॉन्च केला आहे. 50MP प्राथमिक कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 6GB + 128GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. कंपनीच्या या नव्या हँडसेटची सुरुवातीची किंमत 14,499 आहे. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलबाबतच्या काही खास गोष्टी …

Vivo Y22

6.55-इंचाचा डिस्प्ले –

Vivo च्या या स्मार्टफोनम 6.55-इंचाचा फुल एचडी + 2.5D कर्व्ड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेवल 500 nits आहे. याशिवाय या डिस्प्लेची खास गोष्ट म्हणजे हा फिंगरप्रिंटसह स्क्रॅच प्रूफ देखील आहे. या मोबाइलला मीडियाटेक MT 6769 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo Y22

कॅमेरा– (Vivo Y22)

मोबाईलच्या कॅमेराबाबत (Vivo Y22) बोलायचं झाल्यास, फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेराचा समावेश आहे. तसेच व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी, कंपनी या स्मार्टफोनमध्ये 8- मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

Vivo Y22

5000mAh ची बॅटरी-

1TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करणाऱ्या विवो च्या या मोबाईलला 5000mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Vivo Y22

किंमत –

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Vivo Y22 च्या 4 GB रॅम आणि 64 GB वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. Vivo चा स्मार्टफोन स्टारलाईट, ब्लू आणि मेटाव्हर्स ग्रीन कलर मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.