व्यापाऱ्यांनो सावधान ! शेतीमालाचे नवे- जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा लायसन्स रद्द होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

यावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे- जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे मागणी केली आहे. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे- जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा. अन्यथा आपली व्यापारी लायसन्स बंद करण्याची नोटीसाद्वारे ताकीद दिली आहे.

भारतीय किसान संघ यांनी सातारा बाजारात समितीकडे दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा तालुक्यासह सर्व जिल्ह्यातील आले व्यापाऱ्यांनी आले खरेदी करताना नवा व जुना असे मालाचे वर्गीकरण करण्याची प्रथा चालू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून, त्यामुळे आले पिकासाठी केलेला उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही. आपण शेतीमाल आले खरेदी करताना आले माल नवा किंवा जुना असे वर्गीकरण करू नये. त्या मालाची प्रत पाहून त्याचा योग्य दर करून खरेदी करावा, कारण यापूर्वी जुना- नवा असा कोणताही नियम प्रचलित नव्हता व नाही.

तरी माल खरेदी बाबत योग्य ती काळजी घ्यावी. याबाबत बाजार समितीकडे अशा प्रकारची कुठलीही शेतकऱ्यांची तक्रार आल्यास आपले अनुज्ञप्ती (लायसन्स) रद्द करण्यात येईल, असा इशारा सातारा बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे.