Volkswagen Tiguan Exclusive Edition भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन ऑटोमोबाइल (Volkswagen Tiguan Exclusive Edition) कंपनी फॉक्सवैगनने आपली प्रसिद्ध कार Tiguan SUV चे एक्सक्लुझिव्ह एडिशन लॉन्च केले आहे. या SUV मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याने ही कार अधिक आकर्षक दिसते. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 33.50 लाख रुपये आहे. फोक्सवॅगनचे हे एडिशन प्युअर व्हाइट आणि ओरिक्स व्हाईट (सिल्व्हर) या 2 रंगात मिळेल.

Volkswagen Tiguan Exclusive Edition

काय मिळतात फीचर्स-

Volkswagen Tiguan च्या या SUV मध्ये जेश्चर कंट्रोल्ससह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इल्युमिनेटेड स्कफ प्लेट्स, व्हिएन्ना लेदर सीट्स, (Volkswagen Tiguan Exclusive Edition) सॉफ्ट टच डॅशबोर्ड, अॅम्बियंट लाइटिंग, 3-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॅनोरमिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय नवीन Volkswagen Tiguan Exclusive Edition ला मागील बाजूस लोड सिल प्रोटेक्शन, नवीन स्पोर्टी 18-इंच अलॉय व्हील, अॅल्युमिनियम पेडल्स आणि डायनॅमिक हबकॅप्स मिळतात.

Volkswagen Tiguan चे Exclusive Edition लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

 

इंजिन- Volkswagen Tiguan Exclusive Edition

गाडीच्या इंजिन बाबत बोलायचं झाल्यास, फोक्सवॅगनच्या आधीच्या मॉडेलप्रमाणे यामध्येही 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बो-चार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 187bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच कंपनीची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम देखील यामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. ARAI नुसार ही SUV 12.65 kmpl चे मायलेज देते.

Volkswagen Tiguan Exclusive Edition

किती आहे किंमत-

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tiguan Exclusive Edition ची एक्स-शोरूम किंमत 33.50 लाख रुपये आहे. ही कार बाजारात जीप कंपास, ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन सी5 एअरक्रॉस या गाड्यांशी थेट (Volkswagen Tiguan Exclusive Edition) स्पर्धा करेल.

हे पण वाचा : 

TATA चा ग्राहकांना झटका; या गाड्यांच्या किंमती वाढल्या

Maruti Baleno CNG vs Swift CNG : कोणती कार आहे Best? पहा किंमत फीचर्स अन् मायलेज

Marut E-Tract 3.0 : आता शेतात फिरवा Electric Tractor; तासाला फक्त 10 रुपये खर्च

Honda लवकरच आकर्षक फीचर्ससह लाँच करणार ही स्टायलिश ई-स्कूटर